विनाशाच्या उंबरठ्यावरून पुनरागमन: भीषण वैश्विक दबावाखालील महाकाय आकाशगंगेत (J1007+3540) कृष्णविवराची पुनर्जागृती

पुणे/मनिपाल: एका आंतरराष्ट्रीय संशोधक पथकाने J1007+3540 या 'महाकाय' (Giant) रेडिओ आकाशगंगेचा शोध लावला आहे. या संशोधनात सुमारे १० कोटी वर्षांच्या प्रदीर्घ शांततेनंतर या आकाशगंगेच्या केंद्रातील महाकाय कृष्णविवर (Black Hole) पुन्हा सक्रिय झाल्याचे दुर्मिळ पुरावे मिळाले आहेत. डॉ. सब्यसाची पाल आणि संशोधक शोभा कुमारी यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने भारताच्या uGMRT (Upgraded Giant Metrewave Radio Telescope) सह जगातील काही अत्यंत शक्तिशाली दुर्बिणींच्या साहाय्याने हा ऐतिहासिक क्षण टिपला आहे. ही आकाशगंगा साधारण ३० लाख प्रकाशवर्षांच्या क्षेत्रात विस्तारलेली असून, ती आपल्या 'मंदाकिनी' (Milky Way) आकाशगंगेपेक्षा ५० पटीने विस्तीर्ण आहे.

application/pdf Sabya-Press_Marathi.pdf — 212 KB

Document Actions